स्थानिक बातम्या

भिलपुरा चौकातील दर्ग्यावर महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते मानाची चादर अर्पण अनेक वर्षांची परंपरा राहिली कायम

जळगाव दि.25 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणेशाचे विसर्जन शुक्रवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले. जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वी वर्षांनुवर्षांची सामाजिक ऐक्याची आणि धार्मिक सौहार्दाची परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने जपण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भिलपुरा चौकातील ऐतिहासिक ‘हजरत पीर लालशहा सरकार’ दर्ग्यावर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे व अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाची चादर अर्पण करण्यात आली. यानंतर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाल्या.

 

या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि प्रांताधिकारी योगेश कुमार मीना यांनी दर्ग्यात उपस्थित राहून ही पारंपरिक विधी पूर्ण केली. चादर अर्पण केल्यानंतर महापालिकेच्या मानाच्या गणपतीची सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात महाआरती करण्यात आली. महाआरती संपन्न झाल्यानंतर श्री गणेशमूर्ती विसर्जन मार्गाने पुढे रवाना झाली.

 

महाआरतीला उपमहापौर मनोज चौधरी, तहसीलदार शितल राजपूत, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते अयाज अली यांच्यासह महानगरपालिका व पोलीस प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button