राजकीय

स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण; आमदार सुरेश भोळे यांच्याकडून हरिभाऊ जावळे यांच्या जनसेवेतील योगदानाचा गौरव

जळगाव दि.3 (धर्मेंद्र राजपूत) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त जळगावच्या भाजप कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या एका लोकनेत्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुरेश भोळे (राजूमामा) व भाजपा ज्येष्ठ नेते उदयजी भालेराव यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भरीव कार्याची तसेच त्यांच्या लोकसेवेतील अतुलनीय योगदानाची माहिती दिली. जावळे साहेबांचे कार्य आणि सर्वसामान्यांसाठी त्यांनी घेतलेले कष्ट कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, गटनेते प्रकाश बालानी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, अरविंद देशमुख, वैशाली पाटील, दीपक परदेशी, शक्ती महाजन, प्रकाश पंडित, मयुर भदाणे, संदीप ढंडोरे, महेश चौधरी, महेश कापुरे, माधुरी देशमुख, सरदार तडवी, दत्तात्रय कापुरे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतीस सामूहिक आदरांजली वाहून करण्यात आला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button