क्राईम

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची धडक ‘झिरो टॉलरेंस’ मोहीम; अवैध अड्ड्यांवरील साहित्याची भरचौकात होळी!

जळगाव:दि.11 जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आज पहाटेपासून ‘झिरो टॉलरेंस’ मोहीम राबवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित एचडीपीओ नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी हातभट्टी, प्रोहिबिशन (दारूबंदी) आणि सट्टा अड्ड्यांवर धाडी टाकून मोठी कारवाई केली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, जप्त केलेले साहित्य चक्क सार्वजनिक ठिकाणी जाळून नष्ट करण्यात आल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

 

एकाच वेळी संपूर्ण जळगांव जिल्ह्यात ‘सर्जिकल स्ट्राईक’जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटेपासूनच पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये होती. सट्टा बाजार, गावठी दारूच्या हातभट्ट्या आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या केंद्रांवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सट्ट्याचे साहित्य, कागदपत्रे, लाकडी बॉक्स आणि हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.आणि भरचौकात साहित्याची होळी; नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरणकेवळ कारवाई करून न थांबता, समाजावर याचा सकारात्मक परिणाम व्हावा आणि प्रशासनाबद्दल विश्वास वाढावा, यासाठी पोलिसांनी एक वेगळी रणनीती अवलंबली. सट्टा अड्ड्यांवरून जप्त केलेले कागद आणि बॉक्स सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर आणून जाळण्यात आले. तसेच हातभट्टीचे साहित्यही गावकऱ्यांच्या समक्ष नष्ट करण्यात आले.

 

पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे “अवैध कृत्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत” (झिरो टॉलरेंस) हा स्पष्ट संदेश गुन्हेगारांपर्यंत पोहोचला आहे.अशा प्रकारच्या सार्वजनिक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर मानसिक दबाव निर्माण होतो. युवकांमध्ये व्यसन आणि जुगाराविषयी नकारात्मकता निर्माण होऊन त्यांना योग्य दिशा मिळण्यास मदत होईल. तसेच, या पारदर्शक कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होणार असून समाजात कायद्याबद्दल आदर निर्माण होईल.या धाडसी मोहिमेमुळे जळगाव जिल्ह्यात सामाजिक शिस्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button