राजकीयस्थानिक बातम्या

जळगाव जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे

जळगाव, दि. २३  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या पत्रान्वये, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर २४ व २५ ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव व तपशिलांमध्ये दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांसह स्थलांतरित किंवा गैरहजर असल्यामुळे नाव सुटलेल्या नागरिकांना या शिबिरांच्या माध्यमातून मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नवमतदारांनाही या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिक, नवमतदार आणि प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या संबंधित नागरिकांनी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर भेट देऊन आवश्यक अर्ज सादर करावेत. मतदार यादीत नाव नोंदविणे किंवा आवश्यक दुरुस्ती करून घेण्यासाठी या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button