क्राईम

जळगाव बसस्थानक परिसरात जेष्ठ नागरिकांची फसवणूक प्रकरणी 2 सराईत स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

जळगाव:दि.6 जळगाव बसस्थानक परिसरात फसवणूक करून ज्येष्ठ नागरिकांचे दागिने आणि पैसे लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात आली आहे.

२० एप्रिल २०२६ रोजी गजानन विठोबा सजेराव (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे बसस्थानक परिसरात असताना, दोन अज्ञात इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवले. “तुमचा शनिदोष काढून देतो” असे सांगून भोंदूगिरीच्या साहाय्याने त्यांच्या हातातील अंगठी आणि रोख रक्कम काढून घेत पोबारा केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पथकाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा आणि चाळीसगाव येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

१. अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा)

२. मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. चाळीसगाव)

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांचा तिसरा साथीदार सद्दाम मदारी याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अकरम शेख,नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल रडगे, रवींद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील,दिनेश पाटील, आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. जळगाव RPF आणि नेत्रम विभागाच्या पंकज वाघ, मुबारक देशमुख, पंकज खडसे, कुंदनसिंग बयास  कर्मचाऱ्यांनीही या तपासात मोलाची मदत केली.

आवाहन: बसस्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींच्या बोलण्याला बळी पडू नका आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button