क्राईमस्थानिक बातम्या

जळगांव:३ सायबर कॅफेवर पोलिसांचा छापा; अश्लील चाळे करणाऱ्यांवर कारवाई

जळगाव: जळगाव शहरातील नामांकित एम.जे. कॉलेज परिसरातील सायबर कॅफेमध्ये तरुण-तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लील चाळे करण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचा संशयावरन पोलिसांनी एक धक्कादायक प्रकार समोर आला आणला याप्रकरणी जळगाव पोलिसांनी शनिवारी, ९ मे २०२६ रोजी दुपारी धडक कारवाई करत तीन अवैध सायबर कॅफेवर छापे टाकले आहेत.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी  नितीन गणपुुरे यांना गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली होती की, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एम.जे. कॉलेज परिसरात काही कॅफेमध्ये तरुण मुला-मुलींना खासगी जागा उपलब्ध करून दिली जाते आणि तिथे अश्लील प्रकारांना खतपाणी घातले जाते  या माहितीच्या आधारे रामानंद नगर पोलीस आणि जळगाव पोलीस दलाच्या दामिनी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

या छाप्यादरम्यान काही तरुण मुले आणि मुली अश्लील चाळे करताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्यानंतर योग्य समज देऊन सोडून दिले मात्र मालकांविरुद्ध गुन्हे दाखलयाप्रकरणी पोलिसांनी केवळ मुलांवरच नाही, तर अशा कृत्यांना वाव देणाऱ्या कॅफे चालक आणि मालकांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२९ आणि १३१(अ-३) नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.गुन्हा रजिस्ट्रार क्रमांक: १४७/२०२६, १४८/२०२६, आणि १४९/२०२६ .सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र राजपुत आणि जितेंद्र राठोड करत आहेत.

शैक्षणिक परिसरात चालणाऱ्या अशा अवैध व्यवसायांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी अशा कॅफेवर सतत नजर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button