स्थानिक बातम्या

महावितरणचा कौतुकास्पद कामगिरी ! जळगावात ऐन दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अवघ्या काही वेळात वीजपुरवठा सुरळीत; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने नागरिक समाधानी 

जळगाव दि.19 (धर्मेंद्र राजपूत) : “कोण म्हणतं महावितरणचे कर्मचारी वेळेवर काम करत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत जळगाव शहरातील चंदनवाडी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ऐन दसऱ्याच्या एक दिवस आधी चंदनवाडी परिसरात घडलेल्या एका घटनेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

 

शनिपेठेतील चंदनवाडी परिसरात अचानक विजेच्या एका खांबावर (पोल) शॉर्ट सर्किट झाले. या शॉर्ट सर्किटमुळे पोलवरून मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडू लागल्या आणि पाहता पाहता पोलवरील वायरींनी पेट घेतला. वायरी जळू लागल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. ऐन सणासुदीच्या काळात, दसऱ्याच्या अवघ्या एक दिवसाआधी संपूर्ण परिसर अंधारात बुडाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सजग नागरिकांनी आणि माजी नगरसेवक चेतन सनकत यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी महावितरणच्या विद्युत विभागातील शनिपेठ परिसरातील कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच, सणासुदीचे दिवस असूनही कोणतीही टाळाटाळ न करता शनिपेठ उपकेंद्राचे कर्मचारी अत्यंत तत्परतेने आणि युद्धपातळीवर सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले.

 

यावेळी कर्मचारी विजय जाधव, शरद पवार कैलास कोळी, शुभम पाटील, समाधान पाटील, कर्मचाऱ्यांनी कसलाही विलंब न लावता तात्काळ जळालेल्या वायरी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. अत्यंत कमी वेळेत त्यांनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि संपूर्ण चंदनवाडी परिसराचा लाईट (वीजपुरवठा) पूर्ववत सुरू केला. महावितरणच्या या सुपरफास्ट कामगिरीमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आणि त्यांचा दसरा सण अंधारात जाण्यापासून वाचला.

 

या संकटकाळात स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवकांनीही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून मोलाचा पुढाकार घेतला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या कर्तव्यदक्षतेमुळे कामगिरीने संपूर्ण परिसरातून या कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button