शिक्षण प्रसारक मंडळातर्फे भव्य सायकल रॅली; महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः सायकल चालवत वाढवला विद्यार्थ्यांचा उत्साह


जळगाव:दि.29 (धर्मेंद्र राजपूत) शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै. एडवोकेट. अच्युतराव आत्रे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यार्थ्यांसाठी एका भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृती’ असा महत्त्वपूर्ण संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, केवळ मार्गदर्शन न करता महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः सायकल चालवून या रॅलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या उत्साही सहभागामुळे रॅलीत सहभागी झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.

पहाटे 7 वाजता उत्साही वातावरणात सायकल रॅलीची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल चालवण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

असा होता रॅलीचा मार्ग:
ही सायकल रॅली शहरातील प्रमुख भागांतून मार्गक्रमण करत पुढे गेली. रॅलीचा मार्ग खालीलप्रमाणे होता:कन्या शाळा (सुरुवात)गोकुळ स्वीट्सवनिता मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलबेंडाळे शाळा (उजवीकडे)स्टेट बँकबस स्टँडस्वातंत्र्य चौकआकाशवाणी चौककाव्यरत्नावली चौकडी मार्टमोहाडी रोडलांडोरखोरी (अंतिम टप्पा)या यशस्वी उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट सुशील अत्रे एडवोकेट पंकज अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते




