क्राईम

जामनेरात IPL सट्ट्याचा अड्डा उद्ध्वस्त; १० लाखांच्या मुद्देमालासह ४ जण जाळ्यात

जामनेर:देशभरात आयपीएल (IPL) क्रिकेटचा फिव्हर चढलेला असतानाच, दुसरीकडे या सामन्यांवर छुप्या पद्धतीने चालणाऱ्या सट्टेबाजीवर पोलिसांनी आता वचक निर्माण केला आहे. जामनेर शहरात हिवरखेडा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या ऑनलाइन आयपीएल सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे साडेदहा लाख रुपयांच्या मुद्देमालासह चार सट्टेबाजांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

 

गुप्त माहितीवरून टाकली धाडजामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिवरखेडा रोडवरील एका घरात काही लोक आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सदर ठिकाणी धाड टाकली. यावेळी घरात ऑनलाईन सट्टेबाजीचे व्यवहार सुरू असल्याचे उघड झाले.रोख रक्कम आणि ४१ ATM कार्ड जप्तया कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे.

 

यामध्ये प्रामुख्याने:९,०२,३०० रुपये रोख रक्कम.१,३०,००० रुपये किमतीचे मोबाईल फोन्स.२५,००० रुपये किमतीचा टीव्ही आणि साउंड बार.महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल ४१ ATM कार्डे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.असा एकूण १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे:१) देवानंद सुभाष सोनवणे (जामनेर)२) रितेश अशोक नेरकर (जामनेर)३) परीक्षित रवींद्र पाटील (जामनेर)४) प्रवीण जगन्नाथ टहाकडे (जामनेर)गुन्हा दाखल याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे जामनेरमधील सट्टेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button