क्राईम

जैन ड्रीम स्पेसेसवर JCL लीग क्रिकेटचा महाकुंभ; चाहत्यांची तुफान गर्दी!

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल… सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव दि.१९ (धर्मेंद्र राजपूत) मेहरूण तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर सुरु असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेत रोमांच वाढत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग चा तिसऱ्या सामना अमळनेर सुहांस जायंटस विरूद्ध जळगाव कोगटा किंग यांच्यात खेळविण्यात आला. नाणेफेक अमळनेर सुहांस जायंटस ने जिंकून कर्णधार शुभम शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकप्रसंगी बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी पंकज बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. जळगाव कोगटा किंगच्या मजबुत फलंदाजीचे दर्शन आज पुन्हा घडले. पहिल्या चार ओव्हर मध्ये ४४ धावा ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी जोडल्यात. धोकादायक ठरत असलेल्या भागीदारीला गौरव ठाकूर ने जितेंद्र नाईकची विकेट घेत तोडली. यानंतर सामन्याचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेत १० उत्तूंग षटकार खेचत ८ चौकारांसह वादळी खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसले याने शतक ठोकले. अवघ्या ६५ चेंडूत १३० धावा करुन त्याने विक्रम रचला. त्याला अक्षय मेघानी २७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३३ धावा करत चांगली साथ दिली. निर्धारीत २० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात जळगाव कोगटा किंगने २२० धावांचे विशाल लक्ष्य रचले.

पलटवार करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरवात अडखळत झाली. कर्णधार शुभम शर्मा ने एकतर्फी किल्ला लढवत ३९ चेंडूत ६८ धावा केल्यात त्या पाच चौकार व ४ षटकार लगावले. मानव टिभीरीवाला याने १९ चेंडूत ३४ धावा केला त्यासाठी त्याने तब्बल चार षटकार खेचले व एक चौकार लगावला. रणजीत निकम याने १५ चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीन २५ धावा करून सामनात रंगत आणली. शेवटी ६ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंतच अमळनेर सुहांस जायंटसला मजल मारता आली. जळगाव कोगटा किंग संघाकडून मनिष चौहान ने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट पटकाविला. कर्णधार जगदीश झोपे, बिपीन चांगरे प्रत्येकी एक गडी बाद केला. जळगाव कोगटा किंग ३१ धावांनी विजयी झालेत. सलग दोन विजयांसह ४ गुण घेऊन जळगाव कोगटा किंग अव्वल स्थानावर पोहोचला. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार ओम भोसले याला मिळाला. तर डॉट बॉल साठी राज बेलदार या खेळाडूला सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी दाल परिवारचे प्रेम कोगटा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल, नितीन पाटील यांची उपस्थीती होती. पंच म्हणून मंगेश नार्वेकर, संदीप गांर्गुेडे यांनी काम पाहिले. तर गुणलेखन म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button