क्राईम

जळगांव:१ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात!

जळगाव:दि.14 लाज लूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनोद पितांबर अहिरे (40) संशयित याने एक लाखाची लाज स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा त्यांना कायद्याचा हिसका दाखवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सज्ज असतो. अशाच एका धडक कारवाईत, जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे (वय ४०) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जेरबंद  करण्यात आले आहे.

 

तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो निकाली काढण्यासाठी विनोद अहिरे यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने जळगाव एसीबीकडे धाव घेतली.

एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी (१३ एप्रिल २०२६) सायंकाळी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरातच सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती ठरलेली १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना विनोद अहिरे यांना पथकाने झडप घालून ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरू आहे.

कारवाईत सहभागी असलेले अधिकारी

ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगांव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक, योगेश ठाकुर, हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, पो उप निरी. सुरेश पाटील, मपोहेकों,संगिता पवार, पोकों, राकेश दुसाने, पोकों/ सचिन बाटे, पोकों/ अमोल सुर्यवंशी, यांनी केली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button