क्रीडास्थानिक बातम्या

‘टर्फ’चा विळखा! नियमावली पायदळी तुडवत छुप्या पद्धतीने ‘खेळ’ सुरू?

बॉक्स क्रिकेट

जळगाव: शहरात सध्या गल्लोगल्ली ‘टर्फ क्रिकेट’चे वेड वाढले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र, खेळाच्या या आवडीचा फायदा घेत काही व्यवसायिकांनी खुल्या भूखंडांवर (Open Plots) अतिक्रमण करून तिथे व्यावसायिक टर्फ उभे केल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाला कात्री लागत असून, नियमावली धाब्यावर बसवून हे अनधिकृत व्यवसाय जोमाने सुरू आहेत.

खेळाला प्रोत्साहन मिळणे गरजेचे असले तरी, कर चुकवून सुरू असलेले हे ‘बॉक्स क्रिकेट’ टर्फे प्रशासनाच्या रडारवर केव्हा येईल जळगावकर आता महापालिका आयुक्तांच्या धडक कारवाईकडे लक्ष लावून आहेत.

नक्की काय आहे नियम? (टर्फ क्रिकेट सुरू करण्याची नियमावली)

महानगरपालिका हद्दीत टर्फ क्रिकेट किंवा कोणतेही क्रीडा संकुल सुरू करण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असते:

जागेचा वापर (Land Use): संबंधित जागा व्यावसायिक वापरासाठी (Commercial Use) अधिकृत असावी लागते. बांधकाम परवाना,बिगरशेती (NA) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.ध्वनी आणि वेळेचे नियम,GST नोंदणी: जर टर्फचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर GST नोंदणी करावी लागते

महापालिकेची परवानगी: खुल्या भूखंडावर बांधकाम किंवा जाळ्यांचे (Nets) आवरण घालण्यापूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागाची (Town Planning) परवानगी आवश्यक असते.

व्यावसायिक परवाना (Trade License): टर्फवर तासाला ८०० ते २५०० रुपये आकारून व्यावसायिक नफा कमवला जातो, त्यामुळे महापालिकेचा रितसर ट्रेड लायसन्स घेणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरातिचे फलक लावले जातात, टर्फच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आणि आपत्कालीन सुरक्षेच्या उपाययोजना असणे बंधनकारक आहे.

कराचे नुकसान: या टर्फमधून लाखो रुपयांची उलाढाल होते, त्या ठिकाणी अनधिकृत बॅनर तसेच होर्डिंग लावले जातात मात्र महापालिकेला कोणताही ‘व्यावसायिक कर’ (Property Tax) किंवा भाडे मिळत नाही.

बेकायदेशीर वीज वापर? : रात्रीच्या वेळी फ्लडलाईटसाठी वापरली जाणारी वीज ही अधिकृत व्यावसायिक जोडणीची आहे का, की चोरीची? हा मोठा प्रश्न आहे.?

अनधिकृत बांधकाम: लोखंडी जाळ्या आणि शेड उभारून जागेवर बांधकाम केले जातात.

जप्तीची कारवाई: परवानगी नसलेल्या आणि अतिक्रमण केलेल्या टर्फचे साहित्य जप्त करून ती जागा मोकळी करण्याची मोहीम राबवली जाऊ शकते का?

दंड: विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर मागील थकीत करासह मोठा दंड आकारला जाऊ शकतो का?या कळे सर्वांच्या नजरा लागल्या आहे काय कारवाई होऊ शकते

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button