मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगांवच्या मानाच्या महापालिकेच्या गणपतीची महाआरती


जळगाव :(धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहर महानगरपालिकेतील मानाच्या गणपतीचे शुक्रवारी रात्री राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
महानगरपालिकेची परंपरा अशीच पुढे कायम राहावी, यासाठी पालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांसोबत उत्तम समन्वय राखून जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम केले पाहिजे, असे प्रतिपादन मंत्री गिरीश महाजन यांनी महाआरतीनंतर उपस्थितांना संबोधित करताना केले.

याप्रसंगी मंचावर जळगावच्या खा. स्मिताताई वाघ, महापौर दीपमालाताई काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि उपायुक्त धनश्री शिंदे उपस्थित होते.
प्रसंगी नगरसेवक सुनील खडके, अरविंद देशमुख, सुरेश सोनवणे, विशाल भोळे, वैशाली पाटील, अंकिता पंकज पाटील, कविता सागर पाटील, मानसी भोईटे, अमर जैन, नरेंद्र आत्माराम पाटील, रिटा सपकाळे, जाकीर खान पठाण, रमेश मतानी, उज्वला बाविस्कर, रेश्मा काळे,माधुरी बारी, अनिता भापसे, अनिल अडकमोल, विजय बांदल, कविता शिवदे आदी नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. आरतीनंतर उपस्थितांनी दर्शनाचा लाभ घेतला.




