स्थानिक बातम्या

ढोल-ताशांचा गजर, लाईट शोने रंगली ‘जळगावचा गणराज’च्या आगमनाची पूर्वतयारी; अमर गणेश मंडळात पाठपूजन उत्साहात

जळगाव :दि1 (धर्मेंद्र राजपूत) बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या शेजारील अमर गणेश मंडळाच्या वतीने ‘जळगावचा गणराज’ गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पाठपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.भक्तिमय वातावरण, ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक लाईट शो यामुळे परिसरात गणेशोत्सवाच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद तायडे, सागर सपके आणि विशाल  भोळे,

मनोज चौधरी, किशोर भोसले, सुरज दायमा, पियुष गांधी,पियुष पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते ‘जळगावचा गणराज’ची आरती** करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण केले. विशेष म्हणजे, श्रावण सोमवार असल्याने मंडळाच्या वतीने भाविक व उपस्थितांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

कार्यक्रमातील आकर्षक लाईट शो तसेच विश्वगर्जना ढोल पथकाच्या दमदार ढोलवादनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला असून, लाईट शोने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.

 

जळगावचा गणराज’च्या आगमनाची चाहूल लागताच परिसरातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अमर गणेश मंडळाच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली.

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमामुळे अमर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष बबलू भोई, उपाध्यक्ष जितू भाऊ दाभाडे, सदस्य अनिरुद्ध तिवारी आणि सदस्य जगदीश वाघमारे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button