जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह २६ अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदके!


जळगाव दि.16 (धर्मेंद्र राजपुत) जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोलीस दलात बजावलेल्या दीर्घकालीन, प्रामाणिक आणि निष्कलंक सेवेसाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, जळगाव पोलीस दलातील तब्बल २६ अधिकारी व अंमलदारांना विविध पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये स्वतः जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचाही समावेश आहे.
जळगाव पोलीस दलाला मिळालेल्या एकूण २६ पदकांमध्ये खालीलप्रमाणे गौरवाचा समावेश आहे:

अति उत्कृष्ट सेवा पदक: ०९ अधिकारी व अंमलदारउत्कृष्ट सेवा पदक: १४ अधिकारी व अंमलदारविशेष सेवा पदक: ०१ अधिकारी/अंमलदारपोलीस पदक (PM): ०२ अधिकारी/अंमलदारअधिकारी ते अंमलदारांचा सन्मान:या मानाच्या यादीत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह पोलीस दलातील विविध वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. आपल्या कर्तव्यात सातत्य, शिस्त आणि जनसेवेची बांधिलकी जपणाऱ्या या सर्व शिलेदारांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्य आणि केंद्र पातळीवर घेण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आले.
पोलीस दलातर्फे कौतुकाचा वर्षाव
दीर्घकालीन व निष्कलंक सेवेतून पोलीस दलाची कार्यक्षमता आणि जनसेवेचा आदर वाढवणाऱ्या सर्व पदकविजेत्यांचे जळगाव पोलीस दलातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या प्रामाणिक सेवेची पावती असून, यामुळे जळगाव पोलीस दलाचा आत्मविश्वास आणि ऊर्जा आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातून या सर्व पदकविजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे



