एंटरटेनमेंट

जळगावचे नाव बॉलीवूडमध्ये गाजणार! ‘दिल पे तेरा नाम’ अल्बममधून जळगावची जोडी भेटीला

येत्या २४ एप्रिल रोजी 'दिल पे तेरा नाम' हा हिंदी म्युझिक अल्बम प्रदर्शित होणार

जळगाव:दि.20 “स्मॉल सिटी, बिग ड्रीम्स” या उक्तीला सार्थ ठरवत जळगावच्या तरुणाईने आता चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे. जळगावची स्वतःची प्रतिभा आता राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी सज्ज झाली असून, येत्या २४ एप्रिल रोजी ‘दिल पे तेरा नाम’ हा हिंदी म्युझिक अल्बम प्रदर्शित होणार आहे. या अल्बमच्या माध्यमातून जळगावची एक नवी कोरी जोडी बॉलीवूडच्या ‘स्पॉटलाईट’मध्ये येणार आहे.

 

जळगावची जोडी: या अल्बममध्ये मुख्य भूमिकेत जळगावचा उदयोन्मुख कलाकार नमन ठक्कर आणि अभिनेत्री दिव्या पाटील झळकणार आहेत.जळगावची माती आणि इथला टॅलेंट आता सातासमुद्रापार पोहचायला सज्ज झाला आहे! निर्माता निखिल ठक्कर यांची भव्य निर्मिती असलेला ‘दिल पे तेरा नाम’ हा म्युझिक अल्बम २४ एप्रिलला रिलीज होत आहे.

या गाण्यात जळगावचा हॅण्डसम हंक नमन ठक्कर आणि ग्लॅमरस दिव्या पाटील यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी असणार आहे. केवळ जळगावच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर या गाण्याची क्रेझ निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जळगावच्या या ‘रायझिंग स्टार्स’ना आता तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.

लक्षात ठेवा, तारीख: २४ एप्रिल! जळगावच्या या जोडीला बॉलीवूडच्या शिखरावर पाहण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत ना?

निर्मिती: या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती निखिल ठक्कर यांनी केली आहे. जळगावच्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ही मोठी झेप घेतली आहे.

जळगाव ते बॉलीवूड हा प्रवास खडतर असला तरी, नमन आणि दिव्या यांच्या मेहनतीने हे स्वप्न सत्यात उतरले आहे. “मेड इन जळगाव” हा अभिमान उराशी बाळगून या टीमने ‘दिल पे तेरा नाम’ या अल्बमची निर्मिती केली आहे. या अल्बममधील गाणी आणि सादरीकरण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

जळगावच्या या ‘रायझिंग स्टार्स’साठी हा केवळ एक अल्बम नसून, जळगावच्या गुणवत्तेला मिळालेली एक मोठी पावती आहे. २४ एप्रिलला होणाऱ्या या भव्य लाँचिंगकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपल्या जळगावच्या कलाकारांना साथ देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button