महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल!


Jalgaon Times: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील २९ महापालिका निवडणुकिंचा कार्यक्रम आज, सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत, राज् निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.
नामनिर्देशन (अर्ज) प्रक्रिया: २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
मतदान: १५ जानेवारी २०२६
मतमोजणी व निकाल: १६ जानेवारी २०२६
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांसह एकूण २९ महानगरपालिकांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबई महापालिकेत एकसदस्यीय, तर उर्वरित २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या बहुप्रतिक्षित निवडणुकांकडे ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिले जात असून, या निकालांचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.




