Uncategorizedस्थानिक बातम्या

उघड्या डीपी आणि लोबकळणाऱ्या तारांबाबत उपमहापौरांचे तातडीच्या सुचना

जळगाव:शहरात अनेक ठिकाणी विद्युत डीपी (DP) उघड्या अवस्थेत पडून आहेत, तर विजेच्या धोकादायक तारा खाली लोबकळत आहेत. इतकेच नव्हे तर या डीपींच्या चारही बाजूंना प्रचंड गवत आणि चारा वाढला असून, त्यावर जंगली वेली चढल्या आहेत. यामुळे संपूर्ण विद्युत यंत्रणा अत्यंत खतरनाक आणि जीवघेणी बनली आहे. नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला हा धोका टाळण्यासाठी जळगावचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी तातडीची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या.

 

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मनपा आणि महावितरण विभागाने समन्वयाने काम करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.या महत्त्वपूर्ण बैठकीत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील महत्त्वाचे निर्णय व सूचना देण्यात आल्या:उघड्या डीपी तातडीने बंद करणार: शहरातील सर्व उघडे व धोकादायक विद्युत डीपी शोधून ते तातडीने सुरक्षित आणि बंदिस्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.लोबकळणाऱ्या तारांवर उपाययोजना: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या धोकादायक आणि सैल झालेल्या विद्युत तारांची त्वरित पाहणी करून आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले.धोकादायक स्पॉट्सचे सर्वेक्षण: शहरातील अशा सर्व धोकादायक विद्युत ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट्स) तातडीने सर्वेक्षण करून त्यांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

 

आगामी गणेशोत्सवाच्या काळात मिरवणूक मार्ग, विविध गणेश मंडळे व भाविकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी विद्युत यंत्रणा, तारा आणि डीपी यांची विशेष आणि कडक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मनपा व महावितरणमध्ये समन्वय: विद्युत यंत्रणेमुळे कोणतीही जीवितहानी अथवा दुर्घटना टाळण्यासाठी मनपा व महावितरण विभागाने संयुक्तपणे आणि समन्वयाने तातडीची कार्यवाही करावी, अशी ताकीद देण्यात आली आहे.

 

प्रतिबंधात्मक दुरुस्ती: सर्व धोकादायक ठिकाणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून, आवश्यकतेनुसार तिथे दुरुस्ती, संरक्षणात्मक उपाययोजना व प्रतिबंधात्मक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिले आहेत

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button