आरोग्यराजकीयराज्यशेतीस्थानिक बातम्या

सत्ता’ नव्हे ‘सेवा’ हाच ध्यास; सहकार ते समाजकारणात विकासाचा ‘चाळीसगाव पॅटर्न’ राबवणारे आमदार मंगेशदादा चव्हाण

जळगांव दि.23 (धर्मेंद्र राजपूत) महाराष्ट्राचा राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत अनेक नेतृत्वे उदयाला आली, काहींनी सत्ता मिळवली तर काहींनी पदे भूषवली. परंतु, जनतेच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण करणारे लोकप्रतिनिधी मोजकेच असतात. राजकारण हे केवळ निवडणुका जिंकण्याचे किंवा सत्ता उपभोगण्याचे साधन नसून, ते समाजपरिवर्तनाचे आणि शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे माध्यम आहे, हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण हे अशाच मोजक्या नेत्यांपैकी एक!….
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय, सामाजिक, सहकार आणि धार्मिक क्षेत्रातील अष्टपैलू प्रवासाचा घेतलेला हा एक वस्तुनिष्ठ वेध….
‘त्रिमूर्तीं’चा विश्वास आणि संकटमोचकांचे मार्गदर्शन
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कामाचा वेग आणि मंत्रालयातील वलय पाहिले की, त्यांच्या पाठीशी असलेल्या राजकीय शक्तीची प्रचिती येते. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा मंगेश दादांवर असलेला अढळ विश्वास चाळीसगावच्या विकासासाठी महत्वाचा ठरत आहे.यात  महत्त्वाचा वाटा आहे तो राज्याचे ‘संकटमोचक’ आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा. गिरीशभाऊंचे खंदे शिलेदार आणि अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मंगेश दादांनी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
.
सहकारात क्रांती: ‘दूध संघाचा’ ऐतिहासिक कायापालट
शेतकरी आणि सहकार क्षेत्राशी मंगेश चव्हाणांची नाळ जुडलेली आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, विरोधकांचे तगडे आव्हान मोडून काढत जेव्हा या संघाच्या चेअरमनपदाची धुरा मंगेश दादांकडे आली, तेव्हा त्यांनी या संस्थेला नवसंजीवनीच दिली. आणि शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव मिळवून दिला. सहकारात ‘राजकारण’ न करता ‘शेतकरी कल्याण’ कसे साधायचे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
आरोग्य सेवा हाच धर्म’ आणि प्रशासकीय क्रांती
आमदार चव्हाण यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा अभ्यास केला, तर त्यांची संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. ‘आमदार आपल्या दारी’ या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय उपक्रमाने प्रशासकीय दप्तरदिरंगाईला पूर्णपणे ब्रेक लावला. संपूर्ण शासकीय यंत्रणा गावोगावी नेऊन हजारो गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन कार्ड, दाखले आणि शेतीविषयक समस्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा करून दिला.याशिवाय, मतदारसंघातील कोणताही नागरिक गंभीर आजाराने ग्रस्त असेल, तर त्याला मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यापासून ते मुख्यमंत्री सहायता निधी व वैयक्तिक मदतीचे जाळे उभे करण्यापर्यंत दादांचे कार्यालय २४ तास कार्यरत असते.
धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन
आमदार मंगेशदादा हे केवळ आधुनिक विकासाचे पुरस्कर्ते नाहीत, तर ते तालुक्याचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कणा मजबूत ठेवणारे नेते आहेत. मतदारसंघातील अनेक प्राचीन, ऐतिहासिक आणि ग्रामदैवतांच्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी शासकीय व वैयक्तिक स्तरावर कोट्यवधींचा निधी आणला. विविध धार्मिक सोहळे, कीर्तन महोत्सव आणि पारायणांना पाठबळ देऊन त्यांनी चाळीसगाव तालुक्यात नेहमीच सलोख्याचे आणि भक्तीमय वातावरण टिकवून ठेवले आहे.

 

‘राजकारणाच्या पलीकडचा’ माणूस!
एका वृत्तपत्राच्या संपादकीय नजरेतून जेव्हा आपण मंगेश दादा चव्हाण यांच्याकडे पाहतो, तेव्हा ते केवळ एक आमदार म्हणून दिसत नाहीत. ते विरोधकांवर आक्रमकपणे तुटून पडणारे झुंजार नेते आहेत, पण त्याच वेळी अनाथ, गरीब आणि निराधारांच्या अश्रू पुसताना अत्यंत भावूक होणारे एक संवेदनशील माणूसही आहेत. निवडणुका येतील आणि जातील, जय-पराजयाची गणिते मांडली जातील; परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन ‘माणूस जोडण्याची’ जी कला मंगेश दादांनी साधली आहे, तीच त्यांची खरी श्रीमंती आहे.
आज 23 ऑगस्ट चाळीसगावचा हा ‘विकासदूत’ आपला वाढदिवस साजरा करत असताना, त्यांच्या पाठीशी मतदारसंघातील आणि त्यांच्या जळगाव शहरातील खंदे समर्थक आणि कार्यकर्त्यांची मैत्री आणि जनतेचे आशीर्वाद आहेत. अशा या अष्टपैलू आणि लोकभिमुख नेत्याला वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक प्रवासासाठी JALGAON Times News टीम तर्फे  हार्दिक शुभेच्छा!

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button