राजकीयशेतीस्थानिक बातम्या

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन  

संस्थापक दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचेही होणार लोकार्पण

जळगाव दि.12 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव तर्फे उद्या गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन व माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण लोकार्पण करण्यात येणार आहे.

 

याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण केंद्राची नूतनीकरण झालेली इमारत तसेच मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण आणि वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटनही याप्रसंगी पार पडणार आहे.

 

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन हे उद्घाटन करणार आहेत तर प्रमुख पाहुणे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आहेत. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण हे आहेत.

 

या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्यसभा खा. ॲड. उज्ज्वल निकम, खा. स्मिताताई वाघ तसेच विधान परिषदेचे आ. नंदकिशोर महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. अनिल पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ.अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील आणि आ. अमोल चिमणराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

या सर्व महत्त्वपूर्ण विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन प्रसंगी दूध संघाच्या सर्व सभासदांनी व सदस्यांनी गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संघाच्या प्रांगणात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button