मुक्ताईनगरमध्ये जनआक्रोश! विजय चौधरीवर कडक कारवाईसाठी निषेध मोर्चा; तहसीलदारांना निवेदन


मुक्ताईनगर:दि.4 ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथरावजी खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. हिनाताई गावित आणि ॲड. रोहिणीताई खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरी याच्या मनोवृत्ती विरोधात बुधवारी मुक्ताईनगर येथे सर्वपक्षीय व सर्वसमाज बांधवांच्या वतीने भव्य जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला.
‘महिलांचा सन्मान हाच आपला स्वाभिमान’ आणि ‘विकृत प्रवृत्तीचा तीव्र निषेध’ अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण मुक्ताईनगर परिसर दुमदुमून गेला होता. प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्ष, धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोर्चात महिला भगिनी, युवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली.

तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर यांना प्रत्यक्ष भेटून संयुक्त निवेदनाची प्रत सुपूर्द करण्यात आली व त्याची रीतसर पोच घेण्यात आली. निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत: संशयित आरोपी विजय चौधरी याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच विनाविलंब अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर प्रशासनाने यावर तात्काळ कडक कारवाई केली नाही, तर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महिला भगिनी व समाज बांधवांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने जनआक्रोश आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल.
प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
या भव्य निषेध मोर्चात भैयासाहेब रवींद्र पाटील, प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष), एस. ए. भोईसर, डॉ. जगदीश पाटील, निवृत्तीभाऊ पाटील, दशरथभाऊ कांडेलकर, ईश्वर रहाणे, प्रविण कांडेलकर, राजू माळी, योगेश कोलते सर, विलास धायडे, डॉ. बी. सी. महाजन, शिवा पाटील, ललित महाजन, ॲड. राहुल पाटील, मनोज तळेले, लक्ष्मण सापधारे, दीपक पाटील (शिवसेना उबाठा), पंकज कोळी, बापू ससाणे, डी. के. पाटील (काँग्रेस), लताताई सावकारे, तृप्तीताई तुषार राणे, सुनीताताई भालेराव, मनीषाताई जावरे, अरुणा पवार, सुधाकर बोदडे (RPI), बुलेस्टीनी भोसले, आबा पाटील, सागर पाटील (काँग्रेस), ज्ञानेश्वर पाटील, निलेश भालेराव, रामभाऊ पाटील, यांच्यासह तालुक्यातील असंख्य राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




