Uncategorizedराज्यस्थानिक बातम्या

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

जळगाव (दि.२९ धर्मेंद्र राजपूत )- जळगाव सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताबाई रामपालखी आणि दीड शतकी पंढरपूरकडे पायीवारी निघाली. जळगाव ते पंढरपूर पायीवारीचे वारीचे स्वागत जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात आले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. तर जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा पालखीचे पूजन आणि वारकरींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भिमराव दांडगे, किशोर पाटील यांनी श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांची सेवा केली.

 

जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या श्रीराम पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता दर वर्षी करण्यात येत असते, हे वाहन वारकऱ्यांसोबतच पंढरपूर येथे जात असते. या पालखीची स्थापना १७९४ मध्ये झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातिथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते. यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्यासह शेकडो वारकऱ्यांसोबत पालखीचे पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले.

 

जैन हिल्सच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ जी. आर. पाटील, मनोहर बागुल, सुनील खैरनार, अभिजीत शुक्ला, नितीन चोपडा, श्रेयेस कुमट यांच्यासह श्रीराम मंदीर संस्थचे विश्वस्त मंडळी उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आले. दिंडीच्या स्वागतासाठी जैन इरिगेशनच्या मानव संसाधन विभाग, सुरक्षा विभाग, राजभोज खानपान विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button