जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार


जळगांव दि.15 (धर्मेंद्र राजपूत)जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव कॅरम लीग- पर्व २ ही स्पर्धा दिनांक २६ ते २८ जून २०२६ दरम्यान कांताई सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट असे ४८ व महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील जैन इरिगेशनचे व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले ८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू सदर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने व नंतर बात पद्धतीने खेळविण्यात येईल. स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक अशा एकूण ६५ हजारांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल सुद्धा देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट ह्या कॅरम बोर्ड व सोंगट्यांसह खेळविण्यात येईल. स्पर्धेतील सर्व ५६ खेळाडूंना आठ संघात विभागण्यात आलेले आहे.

१)मकरा चॅलेंजर्स ह्या संघाचे संघमालक श्री.युसुफ भाई मकरा,आयकॉन खेळाडू जैद फारुकी व कर्णधार शेख हबीब अन्य खेळाडू सलीम अन्सारी, नईम शेख, मोहसीन खान, सलमान खान व फारुख खान.
२)आप्पासाहेब लिजेंड्स संघाचे संघमालक एड. रविंद्र कुलकर्णी, आयकॉन खेळाडू अभिजीत त्रिपणकर ,कर्णधार फिरोज खान अन्य खेळाडू अफजल शेख,मोहम्मद अली बागवान, सिद्दीक शेख, फैजान खान व शाहरुख भिस्ती.
३)सालार किंग्स संघाचे संघमालक रेहान सालार, आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे व कर्णधार आताऊल्लाह खान अन्य खेळाडू नदीम शेख, जब्बार खान, उबेद खान, शेख नाझीम, व रोशन खान
४)स्पोर्ट्स हाऊस स्ट्रायकर्स संघाचे संघमालक आमीर फारुक शेख ,आयकॉन खेळाडू पंकज पवार व कर्णधार सय्यद मोहसिन अन्य खेळाडू अय्युब खान हुजेफा शेख, वसीम मलिक ,सलमान शेख व रिजवान सय्यद.
५)श्रीउत्तम हर्बल्स रायडर्स संघाचे संघमालक श्रीकांत रंगनाथ पाटील, आयकॉन खेळाडू रहीम खान, कर्णधार शेख जुबेर अन्य खेळाडू अनिल मोरे, खालीद शेख,रंगनाथ पाटील, आरिफ बागवान व शेख मोहम्मद जैद
६)लीजर स्पोर्ट्स स्टार्स संघाचे संघमालक अश्फाक शेख , आयकॉन खेळाडू निसार अहमद, कर्णधार नईम अन्सारी अन्य खेळाडू वसीम खान, अर्षद शाह ,आदिल पठाण, परेश देशपांडे व सय्यद साबीर
७)अरीश लायन्स संघाचे संघमालक अरीश शेख , आयकॉन खेळाडू संदीप दिवे, कर्णधार अयाज शेख अन्य खेळाडू जमीर खान, शेख अजीज, रेहान खान, अझहर शेख व अन्सारी साकिब
८)साईनाथ टायटन्स* संघाचे संघमालक आसिफ खान , आयकॉन खेळाडू अनिल मुंडे, कर्णधार रईस शेख अन्य खेळाडू दानिश शेख, सज्जाद खान, मुबशीर सय्यद, रईस सूर्या व शेख मेहमूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २६ जून रोजी सकाळी १०.०० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व कॅरम व क्रीडाप्रेमींनी सदर स्पर्धेत येऊन कॅरमचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.




