क्राईम

एसपी श्रीकांत धिवरे यांचा ‘ॲक्शन मोड’; अवैध धंद्यावर पोलिसांचे छापे; दामिनी पथकाकडून हॉटेल्सची झाडाझडती

जळगाव:दि.3 जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात सुरू असलेले अवैध व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी संपूर्ण पोलीस दलाला ‘ॲक्शन मोड’वर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या  मार्गदर्शनाखाली जळगाव शहरासह जिल्हाभरात  अवैध धंदे,जुगार  दारूचे अड्डे आणि टवाळखोरांवर मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली आहे.

भररस्त्यात पेग मारणाऱ्या तळीरामांना दणका

जिल्ह्यात रात्रीच्या वेळी रस्त्यावर, वाहनांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. शहरात आणि महामार्गांच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

अवैद्य अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

जळगाव शहरातील विविध भागांमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सट्टा-मटका आणि जुगार अड्ड्यांची माहिती मिळताच, एसपी धिवरे यांच्या विशेष पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी छापे टाकले.

दामिनी पथक’ मैदानात; हॉटेल्स आणि लॉजची तपासणी

शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत जळगाव पोलीस दलाचे ‘दामिनी पथक’ देखील सक्रिय झाले आहे. दामिनी पथकाने आज शहरातील अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि संशयास्पद लॉजमध्ये अचानक जात कसून तपासणी (झाडाझडती) केली. हॉटेल्समध्ये कोणतीही बेकायदेशीर कृत्य किंवा अनैतिक व्यवसाय चालणार नाही, अशी सक्त ताकीद हॉटेल चालकांना देण्यात आली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button