शैक्षणिकस्थानिक बातम्या

जळगावात क्रांतीसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात

जळगाव:दि.11(धर्मेंद्र राजपूत)हिंदवी स्वराज्याचे शूर योद्धा आणि मेवाडचे पराक्रमी राजा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे ‘सूर्यवंशी कुशवाह राजपूत समाज यांच्या वतीने कांचन नगर येथील समाज कार्यालय येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात वीर महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जीवनकार्यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

दरम्यान समाजातील रोहित यांची पालघर येथे पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले. ही समाजासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन वक्त्यांनी केले.

या प्रसंगी सूर्यवंशी कुशवाह राजपूत समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जगदीश राजपूत, उपाध्यक्ष दीपक राजपूत यांच्यासह समाजबांधव, युवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button