क्राईमराज्य

जळगाव जिल्हा पोलीस दलाची राज्यस्तरावर मोहोर; ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये पटकावले सुवर्ण पदक

जळगाव:दि.11 (धर्मेंद्र राजपूत ) महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून आयोजित राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ (TOT) प्रशिक्षणात जळगाव जिल्हा पोलीस दलाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या प्रशिक्षण शिबिरात जळगावच्या टीमने ‘सर्वोत्कृष्ट संघ’ म्हणून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे.राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १, पुणे येथे नुकतेच हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना शस्त्रास्त्रांचे अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम करणे हा होता. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे एक पथक या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.

 

सोबतच जळगावच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी वैयक्तिक स्तरावरही चमकदार कामगिरी केली: सचिन व. चिवंडे (राखीव पोलीस उपनिरीक्षक): ‘शिकवणी’ विषयात ८३/१०० गुण मिळवून प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावले.समीर पठाण (पोलीस अंमलदार): यांनी ‘आंतर वर्ग’ विषयात प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक) आणि ‘उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ म्हणून प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक) पटकावला. तसेच ‘फायरिंग’ मध्ये त्यांनी तृतीय क्रमांक (कास्य पदक) मिळवले.मुजफ्फर अली सैय्यद ( पोलीस उपनिरीक्षक): यांनी ‘शिकवणी’ विषयात तृतीय क्रमांक मिळवून कास्य पदक पटकावले.

 

पोलीस अधीक्षकांकडून गौरवया घवघवीत यशानंतर, आज दिनांक ११ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात  पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते संपूर्ण टीमचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपाधिक्षक (गृह) प्रदीप ठाकूर आणि राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार उपस्थित होते. या यशामुळे जळगाव पोलीस दलाचे राज्यस्तरावर कौतुक होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button