स्थानिक बातम्या

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

जळगाव :(धर्मेंद्र राजपूत) दि.18 सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या कडक उन्हामुळे मोकाट जनावरे, पशू आणि पक्ष्यांना पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक रमेशकुमार मुनोत यांनी भूतदयेच्या भावनेतून जलकुंड आणि परळ मोफत वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.

 

 

या उपक्रमांतर्गत शहरात एकूण १५० जलकुंड आणि ५० परळ वितरित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी हे जलकुंड सावलीच्या ठिकाणी ठेवून जनावरांना पाण्याची सोय करून द्यावी, असे आवाहन मुनोत यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे सावलीची जागा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी बॅनरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मुनोत यांचा उपक्रम; जलकुंड, परळ सावलीत ठेवण्याचे आवाहन

समाजसेवेचा हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी, इच्छुक नागरिकांनी जलकुंड किंवा परळ मिळवण्यासाठी उद्यापासून 9325922305 या क्रमांकावर संपर्क साधून अगोदर नोंदणी करावी, असे आवाहनही रमेशकुमार मुनोत यांनी केले आहे. जलकुंड आणि परळ वाटप दि.२३ सोमवारपासून ओम् साई रिअल इस्टेट कन्सल्टन्स, शाहू नगर, याठिकाणी वाटप केले जाणार आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button