Jalgaon:दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत गजाआड


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि.21शहरात एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडून खळबळ उडवून देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. रामनिवस मंजू गुप्ता (वय ३७, रा. कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
पोलिस प्रशासनाचे मार्गदर्शन आणि पथक:
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या तपासाचे चक्र फिरवण्यात आले.
या यशस्वी कारवाईत खालील अधिकारी आणि अंमलदारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला:
अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक शरद बागल.अंमलदार: सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस अंमलदार विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे आणि प्रशांत परदेशी.नेत्रम विभाग: पोलीस अंमलदार मुबारक देशमुख.
तपासाची चक्रे आणि यश:
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्याने जिल्हापेठ हद्दीतील ‘प्रिन्स वाईन शॉप’ आणि एमआयडीसी हद्दीतील ‘राज वाईन्स’ फोडून रोख रक्कम लंपास केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीचा कौशल्याने वापर करून अवघ्या १२ तासांत आरोपीला निष्पन्न करून ताब्यात घेतले.
मुद्देमाल जप्त:
पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील एकूण २,०४,००० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची बजाज अव्हेंजर मोटारसायकल, असा एकूण ३,०४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.




