राजकीय

प्रभाग 4 शनिपेठेत ‘सोनवणे पॅटर्न’ सज्ज! नागरिकांच्या कामांमुळे भाजपमध्ये उमेदवारी निश्चित

जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली असताना, शहरातील शनिपेठ परिसरात भाजपचे एकनिष्ठ माजी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे आणि त्यांचे कुटुंबीय पूर्णपणे सज्ज झाले आहेत. प्रभागात केलेल्या भरीव विकासकामांमुळे आणि प्रभावी लोकसंपर्कामुळे सोनवणे यांना भाजप पुन्हा संधी देणार, हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

विकासकामांचा झंझावात: मुकुंदा सोनवणे यांनी केलेल्या अविरत जनसेवेमुळे त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी स्वतःला झोकून दिले. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, गटारींचे प्रश्न, आणि पथदिव्यांची सोय यांसारख्या सामान्य माणसाच्या रोजच्या अडचणींवर त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.भक्कम जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास मुकुंदा भाऊच्या साधेपणाच्या आणि उपलब्धतेच्या प्रतिमेमुळे त्यांचा प्रभाग 4 मध्ये मोठा जनसंपर्क तयार झाला आहे.

 ते प्रत्येक नागरिकासाठी ‘आपला माणूस’ म्हणून ओळखले जातात. 

माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात तसेच त्यानंतरही प्रभाग 4 मध्ये, प्रभागाच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रभागातील अनेक जुने आणि दुर्लक्षित भाग त्यांनी विकसित केले आहेत.

रस्ते आणि गटारे: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असलेले सिमेंट-काँक्रिट रस्त्यांचे जाळे त्यांनी प्रभागात उभारले. तसेच, भूमिगत गटार योजनांची कामे मार्गी लावून पावसाळ्यात होणारी पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली आहे.

प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाची दखल:

विकासकामांबरोबरच, सोनवणे कुटुंबीयांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि समस्या व्यक्तिगत पातळीवर सोडवण्यावर भर दिला आहे. आरोग्य, शिक्षण किंवा प्रशासकीय कामांसाठी आवश्यक मदत त्यांनी त्वरित उपलब्ध करून दिली.

प्रभाग क्रमांक चार मधील शनिपेठ, रिधुर वाडा, दाल फळ, गवळी वाडा, चंदनवाडी, परिसरातील नागरिकांच्या मते, “मुकुंदा सोनवणे निवडणुकीपुरते मर्यादित राजकारण करणारे नाहीत. त्यांच्याकडे गेल्यावर आमची कामे तत्काळ मार्गी लागतात, त्यामुळे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.”

निवडणुकीसाठी सज्ज :

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या  मुकुंदा सोनवणे यांच्या कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. त्यामुळे, आगामी मनपा निवडणुकीत प्रभाग 4 मधून मुकुंदा सोनवणे स्वतः रिंगणात उतरले आहे. सोनवणे यांनी विकासकामांच्या माध्यमातून निर्माण केलेली मजबूत जनसंपर्काची फळी, भाजपला या प्रभागात सहज विजय मिळवून देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

सोनवणे कुटुंबीय प्रचाराची आणि जनसंपर्काची रणनीती तयार करत असून, त्यांची सक्रियता बघता शनिपेठेत भाजपचा गड कायम राहणार यात शंका नाही.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button