राज्यव्यापारस्थानिक बातम्या

जळगाव सुवर्ण बाजार: सुवर्णनगरीचा विस्तार की नव्या व्यावसायिक क्षेत्रापुढील आव्हाने? ‘रिंग रोड’ परिसरातील संथ गतीमुळे चर्चांना उधाण!

विशेष प्रतिनिधी, जळगाव: शहराची ओळख ही ‘सुवर्णनगरी’ म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आहे. जळगावच्या सोन्याची अचूक शुद्धता, दर्जेदार क्वालिटी आणि ग्राहकांना भुरळ पाडणारे आकर्षक डिझाइन्स यामुळे येथील सुवर्ण बाजाराने देशभरातील लाखो ग्राहकांचे मन जिंकले आहे. पारंपरिक काळापासून जळगावचा मध्यवर्ती सराफ बाजार हे सोन्याच्या खरेदी-विक्रीचे मुख्य केंद्र राहिले आहे. मात्र, बदलत्या काळानुसार आणि शहराच्या वाढत्या विस्तारामुळे आता या सुवर्ण व्यवसायाची भौगोलिक समीकरणे बदलताना दिसत आहेत.

 

शहराचा विस्तार आणि नव्या पर्यायांचा शोध

जळगाव शहराची लोकसंख्या आणि विस्तार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मध्यवर्ती सराफ बाजारातील वाढती गर्दी, पार्किंगची मर्यादित सोय आणि जागेची असलेली अडचण यामुळे गेल्या काही वर्षांत सुवर्ण व्यवसायाचे विकेंद्रीकरण सुरू झाले आहे. ग्राहकांना अधिक प्रशस्त जागा आणि आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने अनेक व्यावसायिकांनी जळगाव शहरातील ‘रिंग रोड’ या मार्गावर आपली भव्य प्रतिष्ठाने सुरू केली आहेत.

 

व्यावसायिक गतीबाबत संमिश्र सूर आणि उलट-सुलट चर्चा…?

रिंग रोड परिसरात अनेक वर्षांपासून नवनवीन व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र, सुवर्ण व्यवसायाच्या दृष्टीने या भागाचा आढावा घेतला, तर बाजारपेठेत सध्या अत्यंत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही बोटांवर मोजण्याइतकी मोठी व ठराविक प्रतिष्ठाने वगळली, तर इतर अनेक ठिकाणी मात्र अपेक्षेप्रमाणे ग्राहकांची वर्दळ दिसून येत नसल्याचे चित्र आहे.पारंपरिक सराफ बाजाराच्या तुलनेत या भागात खरेदीदारांचा प्रतिसाद अद्यापही अत्यंत संथ असल्याने, “नव्या भागात व्यवसाय स्थिरावणार कधी?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

रिंग रोड परिसर सुवर्ण व्यवसायासाठी आव्हानात्मक?

ग्राहकांच्या या थंड प्रतिसादामुळे सध्या व्यापारी वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. हा परिसर सुवर्ण व्यवसायासाठी खरंच अनुकूल आहे की काही अंशी आव्हानात्मक (किंवा व्यावसायिक भाषेत सांगायचे तर ‘शापित‘) ठरतोय का?

 

अशी एक अनुत्तरित शंका काही घटकांकडून खाजगीत उपस्थित केली जात आहे. मात्र, बाजारपेठेतील जाणकारांच्या मते, कोणत्याही नव्या व्यावसायिक क्षेत्राला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकांच्या अंगवळणी पडण्यासाठी मोठ्या कालावधीची गरज असते. मध्यवर्ती बाजारपेठेची वर्षानुवर्षांची सवय असलेल्या ग्राहकांना नव्या क्षेत्राकडे आकर्षित करणे हे सध्यातरी मोठे आव्हान मानले जात आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button