क्राईम

घरकुलाच्या हप्त्यासाठी १० हजारांची लाच मागितली; कंत्राटी अभियंता आणि खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

जळगाव: दि.4 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धरणगाव पंचायत समितीच्या कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यासह एका खाजगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

योजना: तक्रारदाराला २०२४-२५ या आर्थिक वर्षात पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते.

कामासाठी लाच: घरकुलाच्या बांधकामासाठीचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी, कंत्राटी अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३१) आणि खाजगी इसम सागर शांताराम कोळी (वय ३०, रा. निंभोरा) यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

एसीबीकडे तक्रार: तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली.

कारवाई: एसीबीने पडताळणी केली असता, लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना अशा प्रकारे लाच द्यावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर, हेमंत नागरे,बाळू मराठे, प्रदीप पोळ,राकेश दुसाने,प्रणेश ठाकूर,सचिन चाटे यांनी दमदार कारवाई केली

एसीबीच्या या धडक कारवाईमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या लाचखोरीची माहिती एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button