क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरणारे 2 गजाआड, 4 मोटारसायकली हस्तगत 

Jalgaon Times: दि.22 जळगांव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 1 लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, १७ मे २०२६ रोजी फिर्यादी संतोष राणछोड सेंदाणे (रा. वाघनगर, जळगाव) यांची होंडा शाईन (MH 19 CL 7558) ही मोटारसायकल सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटल परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या तपासातून पोलिसांनी संशयित आरोपी महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोटेनगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुदको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून पोलिसांनी खालील 4 मोटारसायकली हस्तगत केल्या, अशा एकूण 1 लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button