राजकीय

जळगाव विधान परिषद: भाजपचे नंदू महाजन यांना उमेदवारी जाहीर; गिरीश महाजनांच्या ‘विश्वासू’ चेहऱ्यावर पक्षाचा शिक्कामोर्तब!

जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि.1जून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगाव जिल्ह्यातील राजकारण कमालीचे तापले होते. या जागेसाठी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत भारतीय जनता पक्षाने रावेरचे लोकसभा क्षेत्रप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन (नंदकिशोर भगवत महाजन) यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. नंदू महाजन हे भाजपचे संकटमोचक तथा संकट निवारक मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

या निवडणुकीत जळगावची जागा आपल्याकडेच ठेवण्यात आणि स्वतःच्या विश्वासातील नेत्याला उमेदवारी मिळवून देण्यात मंत्री गिरीश महाजन यशस्वी ठरले आहेत. यामुळे जळगाव भाजपमधील त्यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.’

पालकमंत्री गुलाबराव पाटील’ यांच्या प्रयत्नांना धक्का

जळगावच्या या जागेवर शिवसेना शिंदे गटानेही दावा केला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. गुलाबराव पाटील यांनी ही जागा शिवसेनेला सुटावी यासाठी मुंबईत मोठी फिल्डिंग लावली होती. मात्र, संख्याबळ आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजपने ही जागा स्वतःकडे ठेवत नंदू महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, ज्यामुळे शिवसेनेच्या दाव्याला मोठा धक्का बसला आहे.पक्ष संघटनेतील तळागाळातील चेहरानंदू महाजन यांच्या उमेदवारीचे स्वागत पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून केले जात आहे

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button