क्राईमराज्य

जळगाव पोलीस दलाची शान! उत्कृष्ट सेवेसाठी ५ अधिकारी आणि २३ अंमलदारांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा, कर्तव्यदक्षता आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना देण्यात येणारे मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२५’ (DG Insignia) नुकतेच घोषित करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील एकूण ०५ अधिकारी आणि २३ अंमलदारांनी आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवत हे सन्मानचिन्ह पटकावले आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशान्वये या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या गौरवशाली कामगिरीमुळे जळगाव पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व अंमलदार:

 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांचा अभिमान:

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव पोलीस दलाची धुरा सांभाळल्यानंतर, त्यांच्या कार्यकाळातील हा एक मोठा बहुमान मानला जात आहे. त्यांनी सर्व २८ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की, “तुमच्या या यशामुळे जळगाव पोलीस प्रशासनाची मान अभिमानाने उंचावली आहे. हा सन्मान तुमच्या प्रामाणिक सेवेचे आणि कष्टाचे फळ आहे.”या पुरस्कारांमुळे संपूर्ण जिल्ह्यातून जळगाव पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button