क्रीडाराज्य

क्रिकेटचा उत्साह; वाजत-गाजत निघाली ‘जेसीएल २०२६’ ची रणधुमाळी

जळगांव दि. 16 (धर्मेंद्र राजपूत)  जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-2026, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये 18 ते 26 एप्रिल दरम्यान कांताई नगर जैन ड्रिम स्पेसेस मेहरूण तलावाजवळ येथे रंगणार आहे.त्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहा संघ मालक, प्रशिक्षक, खेळाडूंनी सहभाग घेतला.

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगांव काव्यवरत्नाली चौक येथून निघालेल्या रॅलीला हिरवी झेंडी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, दाल परिवारचे अतुल कोगटा, एस. के. ट्रान्सलाईनचे प्रणव कोठारी, सातपुडा आटोमोबाईलचे किरण बच्छाव, सुहांस केमिकल्सचे संदीप काबरा, एम. व्ही. जे. इंटस्ट्रीयल कन्सलन्टशी सीए महावीर जैन, विमल जैन, खलिल बनवट, सागर पार्क क्लबचे सर्व सहकारी, अनिल कांकरिया, जिल्हा क्रिकेट असोशिऐशनचे सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, ऍंड.सुरज जहॉंगिर उपस्थित होते.

 

खेळाडू, प्रशिक्षक व संघ मालक यांनी मोटर सायकल रॅली सहभाग घेतला. ही रॅली काव्यरत्नावली चौक येथून निघून कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा काव्यरत्नावली चौक येथे पोहचली. याठिकाणी संघ मालक व मान्यवरांच्या हस्ते जर्सीचे अनावरण केले. जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेर्न्स, अमळनेर सुहांस जायंटस, रावेर रॉयल्स संघाचे टि शर्ट (जर्सी) अनावरण करण्यात आले.

आता मौका.. जळगाव क्रिकेट लीगचा..

आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा.. खेळाची ताकद दाखविण्याचा, जळगावची शान उंचाविण्याचा.. या टॅग लाईनच्या घोषणा उत्साहाने खेळाडूंनी दिल्यात. संघांचे फ्लॅग, प्रत्येक संघाचे टी शर्ट घालून सहभागी झालेले खेळाडूंनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. जळगाव क्रिकेट लिग-2026 या स्पर्धेमुळे शहरात क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

भव्य रॅली यशस्वीतेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्यांसह रविंद्र धर्माधिकारी, समिर गुळवे, हितेंद्र पटेल, प्रशांत विरकर, वरुण देशपांडे, जगदीश चावला, मोहम्मद फजल, उदय सोनवणे, युवाशक्तीचे विराज कावडिया यांच्यासह सहकारी यांनी सहकार्य केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button