राज्य

14 डिसेंबर रोजी वधु वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन,कलश व मंडपाचे भूमिपूजन संपन्न

श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा

जळगांव दि. ७ श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ (जळगाव ) आयोजित भव्य राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळावा रविवार दि. 14 डिसेंबर 2025 आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे कलश व मंडपाचे भूमिपूजन आज दिनांक 7 डिसेंबर 2025 ( रविवार) रोजी दादासाहेब श्री शांताराम नारायण चौधरी यांच्या हस्ते 11.00 वाजता संपन्न झाले.

याप्रसंगी दत्तात्रय तुकाराम चौधरी, अध्यक्ष युवक मंडळ,अनिल रामदास पाटील सचिव, विनोद शांताराम चौधरी, सिताराम देवरे, बी. एम चौधरी, डॉ.अर्जुन चौधरी, अनिल नथ्यू चौधरी,संजय श्रीराम चौधरी, व्ही. आर. पाटील, अशोक लोटन चौधरी, सुभाष चंदू चौधरी, नामदेव नारायण चौधरी, मधुकर किसन देवरे,सुरेश सोनु चौधरी, मेघ शाम गुलाब चौधरी, राहूल दातात्रय चौ, दिपक धनराज चौधरी, भानुदास चौधरी, जे. बी-चौधरी, दिलीप बाबूराव चौधरी, मांगो श्रावण चौधरी, निलेश शाताराम चौधरी, सुरेश हिरामण चौधरी, प्रशांत अमृत चौधरी, मयुर अरुण ठाकरे, विनोद सुधाकर चौधरी,अर्जुन चौधरी,योगराज चौधरी, कैलास चौधरी, भगवान चौधरी, जितेंद्र संतोष चौधरी, किरण चौधरी, लोकेश चौधरी, भिकन चौधरी सह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

तरी येत्या 14 डिसेंबर रोजी स्थळ: खानदेश सेंटर मॉल, एफ. सी. आय गोडाऊन, गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ जळगाव.मोठ्या संख्येने समाज बांधवांनी वधु वर पालक परिचय मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button