राजकीय
जळगाव महापालिकेवर महायुतीचा भगवा! महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी शिंदे सेनेचे मनोज चौधरी विराजमान

जळगाव (धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाईम्स न्यूज):
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेली निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध करत दोन्ही महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवला आहे. जळगावच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे यांची, तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मनोज चौधरी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया
महानगरपालिकेच्या सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली

.
महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती
यावेळी सभागृहात महायुतीचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि शिंदे सेनेचे नेते प्रतापराव पाटील यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शहराच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, नवीन नेतृत्वाखाली जळगावचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

शहराच्या विकासाला प्राधान्य देणार: नवनिर्वाचित महापौर
आपल्या निवडीनंतर आणि पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि नगरसेवकांचे आभार मानले. “शहरातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्याला आमचे पहिले प्राधान्य असेल. सर्वांना सोबत घेऊन जळगाव शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या निवडीमुळे जळगाव शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, महापालिकेवर आता भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता अधिक भक्कम झाली आहे.