

मुंबई/नाशिक दि.17 (धर्मेंद्र राजपूत) गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीत चर्चेत असलेला आणि प्रतिष्ठेचा ठरलेला नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा अखेर आज सुटला आहे. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याचने जळगांव मध्ये कार्यकर्त्याचा आनंदोत्सव या नियुक्तीचे वृत्त समजताच जळगावमधील त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांने तातडीने आपल्या मोबाईल स्टेटसवर मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो ठेवून त्यांना नाशिकचे पालकमंत्री झाल्याबद्दल खास शुभेच्छा दिल्या आहेत. तर हे मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर कार्यकर्ते आहे अरविंद देशमुख.
जळगाव मनपाचे भाजपचे नगरसेवक आणि मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख यांनी आपल्या मोबाईल स्टेटसवर मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झाल्याची पोस्ट टाकल्याने माहिती समोर आली आहे. आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा देखील सुरु झाली आहे.

जळगावातील कट्टर कार्यकर्त्याचे स्टेटस ठरले चर्चेचा विषय
जळगावचे भाजपचे नगरसेवक आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनी आपल्या मोबाईल व्हॉट्सॲप स्टेटसवर थेट गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवले. त्यामुळे या कट्टर कार्यकर्ता सह अनेकांना मोठा आनंद झालेला आहे. तर पालकमंत्रिपदाची माळ महाजनांच्याच गळ्यात पडणार हे आता निश्चित झाले.

भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडेच अखेर नाशिकची धुरा सोपवण्यात आली आहे.महत्त्वाची दुसरी घोषणा: नाशिकसोबतच अडकलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढाही सुटला असून, रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे भरत गोगावले यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.




