राज्यस्थानिक बातम्या

कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अरुण बागुल यांची निवड

जळगाव | (धर्मेंद्र राजपूत ) कास्ट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य (नोंदणी क्रमांक ५२८३) च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अरुण बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. नामदेवराव कांबळे यांनी संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून ही निवड जाहीर केली.

 

कर्मचारी हित, सामाजिक न्याय, समता आणि संघटनात्मक बांधणीसाठी अरुण बागुल यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच त्यांना जळगाव जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचे अधिकारही बहाल करण्यात आले आहेत.

या निवडीप्रसंगी बोलताना राज्य कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी विश्वास व्यक्त केला की, बागुल यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरुण बागुल यांनी देखील संघटनेची ध्येयधोरणे शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवून, सर्वांना सोबत घेत संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्याचा संकल्प यावेळी बोलून दाखवला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:

या निवड सोहळ्याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य मुख्य संघटक सचिव प्रभाकर पारवे, प्राथमिक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे, माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय निकम, कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुनील ढाके, ज्येष्ठ मार्गदर्शक विजयकुमार मौर्य, ज्येष्ठ मार्गदर्शक आर. एस. अडकमोल, डी. व्ही. निळे आणि संजय कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव:

अरुण बागुल यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्ष किरणकुमार मालाजंगम, दीपक भोई, रवींद्र पालवे, रमेश सोनवणे, बी. एस. शिरसाठ, विलास पवार, विनायक बैसाणे, योगेश तायडे, प्रशांत महाजन, अजित चव्हाण, राजेंद्र केदळे, गुणवंत देवराज, हेमंत मगर, कैलास ठोके, पारसमणी मोरे, अशोक सोनवणे, सचिन बोदडे, सुमित बऱ्हारे आणि विशाल अहिरराव यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button