

जळगांव (धर्मेंद्र राजपूत)दि.1 अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत एमडी (Mephedrone) हा घातक अमली पदार्थ जप्त केला आहे. केलेल्या कारवाईमुळे तब्बल ₹3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या आरोपीचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एलसीबी आणि MIDC पोलिसांची कारवाई!
दिनांक 31 जुलै 2026 रोजी रात्री 10.40 वाजण्याच्या सुमारास, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्र. A-14 समोरील रोडवरपोलीस पथक गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले.त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात एमडी (Mephedrone) हा मानवी शरीरासाठी अत्यंत घातक अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
62.07 ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद; ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त !
1) इम्रान खान हयात खान (वय 36 वर्षे) मूळ रा. आडगाव, ता. जळगाव सध्या रा. करीम नगर, फातिमा नगर, एम.आय.डी.सी, जळगाव.
तपासात निष्पन्न दुसरा
2) रफीक उर्फ गोल्डन रा. मालेगाव, जि. नाशिक. (पूर्ण नाव तपासाधीन)
पोलीस तपासात जप्त करण्यात आलेला एमडी हा अमली पदार्थ रफीक उर्फ गोल्डन याने विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे
39.06 ग्रॅम एमडी (Mephedrone) अंदाजे किंमत – ₹1,96,000
11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी अंदाजे किंमत – ₹36,000
18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी अंदाजे किंमत – ₹56,000
➡️ एकूण एमडी जप्त : 62.07 ग्रॅम ➡️ एकूण किंमत : ₹2,88,000
याशिवाय, मोबाईल फोन किंमत – ₹20,000,मोटरसायकल किंमत – ₹50,000
एकूण जप्त मुद्देमाल : ₹3,58,000
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 635/2026 अन्वये अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) मधील कलम 8(क), 22(क), 29 तसेच बी.एन.एस. कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी : स.पो.फौ. अतुल रघुनाथ वंजारी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव.
तपास अधिकारी : पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव.
जळगाव पोलिसांचा निर्धार
“नागरिकांनीही अमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास निर्भयपणे पोलिसांना कळवावे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि नागरिक यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.”




