राजकीय

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

नगराध्यक्ष व नगरसेवकांना महायुतीचे विजयी करण्याचे आवाहन

नशिराबाद:विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. भेटीदरम्यान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.

 

विकासाभिमुख नेतृत्वाला संधी द्या : नगराध्यक्ष योगेश पाटील

नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना नगराध्यक्ष योगेश पाटील म्हणाले, “नंदकिशोर महाजन हे विकासाभिमुख नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे. असे सक्षम नेतृत्व विधान परिषदेत गेल्यास शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल.”

 

आमदार व जिल्हाध्यक्षांचे आवाहन

या वेळी आमदार मंगेश चव्हाण यांनीही उपस्थित नगरसेवकांना नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या भेटीमुळे नशिराबादमध्ये महायुतीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button