राज्यशैक्षणिकस्थानिक बातम्या

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

एरंडोल (धर्मेंद्र राजपूत) दि.6 येथील ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

आकाशने IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत B.Tech पदवी प्राप्त केली आहे. त्याची निवड देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथेही झाली होती. अत्यंत कमी वयात UPSC परीक्षा उत्तीर्ण होत त्याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडविले आहे.

आकाश आणि त्याचा लहान भाऊ अभय यांच्या शैक्षणिक प्रवासात पालक म्हणून ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांनी नेहमीच मित्रवत भूमिका घेतली. मुलांना उत्तम शिक्षण, व्यापक वाचनाची सवय आणि देश-विदेशाविषयी सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रेरित केले. साधी राहणी आणि उच्च विचार यांचा संस्कार त्यांनी मुलांमध्ये रुजवला.

 

विधी सेवेत ॲड. ओम त्रिवेदी यांचे स्वतंत्र स्थान असून भू-संपादन क्षेत्रात महाराष्ट्रभर त्यांचे कार्य आहे. सौ. रेखा त्रिवेदी यांनी दक्षिणाम्नाय श्री शारदापीठम्, श्रृंगेरी (कर्नाटक) येथे आयोजित ‘गीता ज्ञान यज्ञ’ परीक्षेत श्रीमद्भगवद्गीतेचे १८ अध्याय कंठस्थ करून यश संपादन केले आहे.

आकाशचा भाऊ अभय सध्या राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर (NLU) येथे विधी शिक्षण घेत असून शैक्षणिक क्षेत्रात आपला लौकिक निर्माण करत आहे. त्रिवेदी कुटुंबाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button