महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव ने सादर केलेल्या ” संगीत समर्पण ” या नाटकास चार पारितोषिके प्राप्त


जळगाव :दि.4 (धर्मेंद्र राजपूत) ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत सांगली येथे स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव तर्फे मकरंद देशमुख लिखित आणि चिंतामण पाटील दिग्दर्शित ” संगीत समर्पण ” या नाटकास चार पारितोषिके प्राप्त झाली.त्यात मकरंद देशमुख यांना लिखाणासाठी तृतीय पारितोषिक,सौ. प्राची चौधरी ( सत्यभामा ) यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र,कु. मयुरी हरीमकर ( रुख्मिणी ) हिला गायनाचे गुणवत्ता प्रमाणपत्र आणि सौ. नुपूर चांदोरकर-खटावकर यांना वेशभूषेसाठी प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
सदर नाटकाची निर्मिती खान्देश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव यांनी केली असून त्यात भुषण खैरनार ( सुत्रधार व कृष्ण ) कु.मयुरी हरीमकर ( नटी-१ व रुक्मिणी ) सौ.प्राची चौधरी ( नटी-२ व सत्यभामा ) संजय कुलकर्णी ( नारद ) कु. स्वाती डहाळे ( राधा ) आणि कुमार राम चौधरी ( बाळकृष्ण ) यांच्या भुमिका केल्या आहेत. त्यांना साथसंगत राजेंद्र माने ( संवादिनी ) भूषण गुरव ( तबला ) दर्शन गुजराथी ( पखवाज,ढोलकी ) राजेश पुराणिक ( टाळ ) तंत्रज्ञ शरद भालेराव ( नेपथ्य ) पीयूष रावळ ( प्रकाशयोजना ) प्रबुद्ध भालेराव ( पार्श्वसंगीत ) सौ.मीनाक्षी पाटील रंगभूषा ) सौ.नुपूर चांदोरकर-खटावकर ( वेशभूषा ) सौ.मधुवंती देशमुख,सौ.रेणुका जोशी ( रंगमंच व्यवस्था ) ह्या बाजू सांभाळल्या. संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




