राजकीय

ईव्हीएम सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांचा पहारा; धरणगाव तहसील कार्यालयाबाहेर मंडप टाकून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बसले ठाण मांडून !

JALGAON TIMES NEWS:जळगांव दि.६ नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्याने ईव्हीएम मशीन पुढील टप्प्यापर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलीस व प्रशासनावर आहे. मात्र, ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकते? असा आरोप करत या भीतीने अनेक उमेदवार आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जळगांव जिल्हातील धरणगाव येथे स्वतःच पहारा देताना दिसत आहेत.

मतमोजणी लांबल्यानंतर ईव्हीएम सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत !

धरणगाव तहसील कार्यालयात ठेवलेल्या ईव्हीएमजवळ कार्यकर्त्यांनी मंडप टाकून रात्रंदिवस मुक्काम केला आहे. कडाक्याच्या थंडीत शेकोट्या पेटवून ते जागरण करत आहेत. स्थानिक प्रशासनावर विश्वास असला तरी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर विश्वास नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी अधिक माहिती दिली.

कडाक्याच्या थंडीतही मंडपात रात्री कार्यकर्ते शेकोट्या पेटवून देतात पहारा !

“हा फक्त निवडणुकीचा नव्हे तर जनतेचा प्रश्न आहे; रॉकेट नियंत्रित होऊ शकते तर ईव्हीएम हॅकही होऊ शकते,” असा दावा कार्यकर्त्यांनी करत लोकशाही वाचवण्यासाठी सतत पहारा देत असल्याचे सांगितले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button