क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्यीय एटीएम चोरांच्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगांव:दि.15 शहरात एटीएम फोडून चोरी करणाऱ्या एका अट्टल आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीत वापरलेली मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पोलन पेठ परिसरातील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘इक्वीटस स्मॉल फायनान्स बँकेचे’ एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास केले होते. या धाडसी चोरीप्रकरणी ३ एप्रिल २०२६ रोजी बँकेचे मॅनेजर  यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले होते.

 

पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना, पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, हे आरोपी पुन्हा एका चोरीच्या उद्देशाने जळगाव शहरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १४ एप्रिल रोजी मन्यारखेडा रोडवर सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.अटक केलेले आरोपी:१) मोबीन आत्मज मिला (वय २८, रा. बेगी नाजर, जि. सहारनपूर, उत्तर प्रदेश)२) अब्दुल करीम नुर हसन (वय ५२, रा. तितरोद, जि. सहारनपूर, उत्तर प्रदेश)चोरीसाठी वापरली होती पिकअप व्हॅन:पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, ही चोरी करण्यासाठी त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ‘महिंद्रा पिकअप’ गाडी चोरली होती आणि तिचा वापर एटीएम उचलताना केला. या गुन्ह्यात त्यांच्यासोबत आणखी तीन साथीदार सामील होते. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही अशाच प्रकारे एटीएम चोरी केल्याचे समोर आले आहे.जप्त केलेला मुद्देमाल:पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, १० हजार रुपयांचा मोबाईल, ७०० रुपये रोख आणि दोन हेल्मेट असा एकूण ६१,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या टोळीतील उर्वरित फरार साथीदारांचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button