राजकीयस्थानिक बातम्या

श्री गोविंद महाराज यांच्यावरील श्रद्धा व निष्ठा आजही कायम : पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील !

पाळधी ता. धरणगाव (धर्मेंद्र राजपूत) एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील जागृत देवस्थान असलेले श्री गोविंद महाराज यांच्यावरील आपली श्रद्धा व निष्ठा आजही कायम असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज बोलून दाखवली. दरम्यान, ना. पाटील दरवर्षी आरतीसाठी कासोदा येथे जात असतात.

सप्ताहास देणगीसह कीर्तनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कासोदा ग्रामस्थांनी मानले गुलाबभाऊंचे आभार ! 

श्री गोविंद महाराज यांचा सप्ताह निमित्ताने ना.गुलाबरावजी पाटील यांनी देणगी स्वरूपात मदत केली. तसेच कीर्तनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले होते. त्याबद्दल श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळचे ना. पाटील यांची भेट घेत आभार मानण्यासाठी श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळचे पदाधिकारी आले होते. त्यात अध्यक्ष सोनू शेलार, उपाअध्यक्ष वाल्मिक ठाकरे, सचिव संतोष चौधरी, खजिनदार गोपाल पांडे, सचिव रवी मोरे, गोकुळ शिंपी, जितू तांदळे, सुधाम राक्षे, बबन क्षीरसागर, रमेश खैरनार, नंदू खैरनार, दगडू चौधरी यांच्यासह कासोदा ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, ना.पाटील याचे स्विय सहाय्यक हेमंत नारखेडे व नारायण आप्पा कोळी यांनी साहित्य पोहच केले होते.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button