निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ सुभाष चौधरी अनंतात विलीन
जळगाव ;दि (१९) येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी ( वय 79 ) यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले .आज त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले,
यावेळो माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आमदार शिरोष चौधरी, केसीई चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन , प्राचार्य अनिल राव , ऍड प्रकाश पाटील, माजी महापौर नितीन लद्धा, भोरगाव लेवा पंचायत चे सदस्य ऍड संजय राणे आर्किटेक्ट दिलीप कोल्हे, जैन परिवारातील सर्व सदस्य, कंपनी चे सहकारी , शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, वकील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते , यावेळी माजी खासदार डॉ उल्हास पाटील, जैन इरिगेशन चे उपाध्यक्ष अनिल जैन, चौधरी परिवाराच्या वतीने राजीव चौधरी यांनी भावना व्यक्त केल्यात .
डॉ चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन रुग्ण सेवा केली.
डॉ चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते यासह बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठा चे मॅनेजमेंट कौन्सिल चे सदस्य तसेच सिनेट सदस्य , महावीर सहकारी बँकेचे संचालक होते,
विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.