राजकीयस्थानिक बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जळगाव जिल्हा कार्यालयीन जिल्हा सरचिटणीसपदी वाय.एस. महाजन
जळगाव दि.१४ (धर्मेंद्र राजपूत) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने संघटनात्मक कामकाज होणेसाठी वाय. एस. महाजन सर यांची जळगाव जिल्हा कार्यालयीन सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
त्यांचेकडे पक्षाचे सर्व शासकीय कामकाज व कार्यक्रमांच्या नियोजनाच्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल माजी पालकमंत्री सतीषअण्णा पाटील व माजी मंत्री गुलाबरावअप्पा देवकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटीचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व मित्र परिवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.