उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जनसन्मान यात्रेनिमित्त अमळनेर दौऱ्यावर

अमळनेर दि.12 (धर्मेंद्र राजपूत) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील ८ ऑगस्टपासून राज्यात सुरु झालेल्या जनसन्मान यात्रेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेर दौऱ्यावर
सोमवारी १२ रोजी राज्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अमळनेर दौऱ्यावर येणार आहे अंमळनेर येथे शेतकरी व विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहे. युवा संवाद हा कार्यक्रम अमळनेर येथील प्रताप कॉलेज येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. तसेच शेतकरी सन्मान संवाद हा कार्यक्रम कलागुरू मंगल कार्यालय धुळे रोड, अमळनेर येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जन सन्मान यात्रेची केली जय्यत तयारी
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या यात्रेची जय्यत तयारी केली असून अजित पवारांच्या स्वागताचे फलक संपुर्ण शहर तालुक्यात झळकले आहेत. अमळनेरात बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण तेथून सुभाष चौकातील सुभाष बाबूजींच्या पुतळ्यास व अर्बन बँकेसमोर सानेगुरुजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण त्यानंतर दुपारी अर्धातास इंदिरा भुवन येथे त्यांचा वेळ राखीव असणार आहे. व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ स्वागत व शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दुपारी 3.10 वाजता प्रताप महाविद्यालयात युवा संवाद मेळाव्यात त्यांचे आगमन होणार आहे. हा संवाद मेळावा आटोपून दुपारी 4.30 वाजता धुळे रोडवरील कलागुरु मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी सन्मान संवाद साधणार आहे.
जनसन्मान यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार
अजितदादा पवार गटाचे अमळनेरचे मंत्री अनिल दादा पाटील यांनी जनसन्मान यात्रेची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही ‘जनसन्मान यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. ‘जनसन्मान’ यात्रेत समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. ही यात्रा योजनांपुरती सिमीत न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्याही अजित पवार जाणून घेणार आहेत, असेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज 12 रोजी अमळनेरात येत असून त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.