Uncategorized

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प -आ.किशोर पाटिल

पाचोरा (धर्मेंद्र राजपूत) दि.९ जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी समाजाला द्यावयाच्या सुविधांचा देण्याचं आश्वासन दिल असून मतदारसंघांतील प्रत्येक आदिवासी वस्तीत आपल्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या वीर एकलव्यांच्या स्मारकांच्या उभारणीसह पाचोरा शहरातील ‘खारवण’ भागाचे नामकरण ‘एकलव्य नगर’ असे करून याठिकाणी स्वतंत्र गाव वसवण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगत ‘एकलव्य नगर’ आपण विकास कामांसाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबांना स्नेहभेट म्हणुन वीर एकलव्यांची प्रतिमा देऊन वाघुळखेडा हडसन पाचोरा यासह विविध ठिकाणी जयंतीसह झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित केला.

आदिवासी वस्त्यांत उभारणार वीर एकलव्यांचे स्मारक

मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वाडी वस्ती मध्ये एकलव्याच्या स्मारकांच्या उभारण्याचे काम आपण हाती घेतले असून या स्मारकासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात २५ ठिकाणी स्मारक उभारणीला सव्वा करोड रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे. तसेच आगामी काळात अशाच प्रकारे उर्वरित आदिवासी वाड्यावर त्यांमध्ये देखील आपण वीर एकलव्यांचे स्मारक भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

घरकुल व स्मशानभूमी साठी मिळणार जागा

मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या घरकुल व स्मशानभूमी या दोन प्रमुख मागण्या असून या संदर्भात आपण नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या विषयाला चालना दिली असल्याचे सांगत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गावठाण व गायरान जमिनीवर देखील घरकुलांसाठी मंजुरी मिळवणार असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या बाबत आश्वस्त केल्याचे त्यांनी सांगत प्रत्येक वाडीवस्तीत समशानभूमीसाठी देखील जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प -आ.किशोर पाटिल

आगामी काळात आदिवासी बांधवांच्या राहणीमानासह शिक्षण, आरोग्य,सोयीसुविधा यांच्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासात आपण भरीव योगदान देणार असून याबाबतचा संकल्प आपण आजच्या आदिवासी दिनी केला असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी सांगितले.तसेच आपण दिनांक अकरा रोजी आदिवासींचा भव्य मेळावा पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स येथे सकाळी १० वाजता आयोजित केला असून या ठिकाणी आपण आदिवासी तडवी, भिल्ल बांधवांशी संवाद साधणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,धर्मा भिल्ल,शांताराम मोरे, समाधान पाटिल यांची उपस्थिती होती.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button